लतादीदी लवकर बरे व्हा! ची साद !

भारताच्या गानकोकिळा अर्थात भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांची तब्येत स्थिरावतेय.

काही दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांना संसर्गाची लक्षणं असल्यामुळे खबरदारी खातर त्यांना ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांचे डॉ. प्रतीत समदानी यांनी लताजींच्या हेल्थ बुलेटीनद्वारे सांगितले कि लतादीदींना सध्या आयसीयू ठेवलं असून त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत आहे.डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लतादीदींना कोरोना आणि न्यूमोनिया दोन्हीची लागण आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना पुढील सात दिवसांसाठी आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल.

डॉक्टरांच्या माहितीनुसार असे समजते कि लतादीदींच्या वयामुळे त्यांना बरे होण्यास थोडा वेळ लागू शकतो. खरंतर लतादीदी गेल्या दोन वर्षांपासून घराबाहेर देखील पडल्या नाहीत. परंतू त्यांच्या नोकराला कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे लतादीदींनी ही चाचणी करण्यात आली त्यात त्यांनाही लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तेव्हापासूनच त्यांना श्वसनाचा थोडा त्रास होऊ लागला होता. याचा विचार करता खबरदारी खातर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली असणे आवश्यक आहे. म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

जगविख्यात अशा गायिका गानकोकिळा म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा भारतरत्न लतादीदी मंगेशकर सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकल्या असून त्यांनी लवकरात लवकर ठीक व्हावं यासाठी सर्वच स्तरावरून प्रार्थना केली जातेय.


-सुरज खरटमल.

Lata Mangeshkar Updates :

Lata Mangeshar’s younger sister Usha Mangeshkar said we cannot go to see Didi as it is a Covid case.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »