छे…हे असे होते काय गिरणी कामगार, प्रोमोला तीव्र निषेध !

महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरण भात लोंचा, कोण नाय कोंचा’ ! या नव्या चित्राच्या प्रोमोला महाराष्ट्रातील महिला वर्गाकडून तीव्र आक्षेप वर्तवला जातोय.

चित्रपटाच्या प्रोमोमधील गिरणी कामगारांच्या महिलांविषयी चित्रित केलेल्या वादग्रस्त दृश्यांची गंभीर दखल घेत ते दृश्य सेन्सॉर्ड करून हटवण्याची मागणी ‘केंद्रीय महिला अयोगाने’ केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली असून त्याबाबत त्यांना नोटीस पाठवण्यात आलीये.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘नाय वरण भात लोंचा, कोण नाय कोंचा’! हा नवा मराठी सिनेमा वादाच्या जाळ्यात अडकला आहे. सोमवारी या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला. येत्या १४ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार. अगदी दोन दिवसात या प्रोमोला असंख्य विव्हज मिळाले मात्र प्रोमोमधील गिरणी कामगारांच्या महिलांविषयी विकृत चित्रीकरण केल्याचं या प्रोमोत पाहायला मिळतंय. त्यामुळे या प्रोमोला महाराष्ट्रातील महिला वर्गाकडून तीव्र निषेध वर्तवला जातोय. आणि केंद्रीय महिला आयोगाने याची दखल घेत चित्रपटातील वादग्रस्त दृश्य हटवण्याची मागणी केंद्रीय माहिती प्रसारण मंडळाकडे केली आहे. यासंबधी त्यांनी नोटीसही बजावली आहे.

दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरणभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहावर आधारीत हा चित्रपट आहे. मात्र, महेश मांजरेकर यांनी त्या नावामध्ये देखील बदल केला आहे. तसेच, त्यात गिरणी कामगारांविषयी विकृत पद्धतीचे चित्रीकरण केले आहे.महेश मांजरेकर यांच्याबाबतीत हे पहिल्यांदाच असे घडलेले नाही. याआधी देखील त्यांनी जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट काढला होता. त्यातही गिरणी कामगारांच्या अवस्थेचे अक्षरशः विकृत चित्रण केले होते. दरम्यान आता ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या नव्या चित्रपटावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रोमोमधील काही दृश्यांवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत केंद्रीय महिला आयोगाने नोटीस बजावत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

गिरणी कामगार संपांमुळे जरी थोडा खचला होता तरी त्याने हार मानली नव्हती. घरातल्या घरधन्यासोबत त्याची पत्नी कामासाठी बाहेर पडली. मुलांनी नाईट कॉलेज करून शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक गिरणी कामगारांची मुले आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत. असे असताना महेश मांजरेकर पैसा, प्रसिद्धीसाठी मराठी माणसांची, गिरणी कामगारांची अब्रू वेशीवर टांगत आहेत. हे करत असताना मराठी माणसांसाठी झटतो म्हणून सांगणारे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष गप्प का बसलेत? शिवसेनेची आणि मनसेची चित्रपट सेना यावर मूग गिळून गप्प का बसलेत? असा सवाल आता विविध स्तरावरून त्यांना विचारला जात आहे.


-सुरज खरटमल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Translate »