अजूनही बरसात आहे – सयंत रोमांसची कथा

सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या अजूनही बरसात आहे या मालिकेला प्रेषक खास पसंद करत आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची मुख्य भूमिका. या दोन कलाकारांचे चाहते, त्या दोघांची केमिस्ट्री पसंद करताना दिसत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परतले आहेत. यापूर्वी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी ती दोघं, अजूनही बरसात आहे या मालिकेत एकत्र काम करत आहे

सध्याच्या वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका आणली आहे. प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक मॅच्युअर परिपूर्ण प्रेमकहाणी आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मालिकेच्या प्रसारणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिके मधून प्रेक्षकांना प्रेम आणि जिवनाच्या जवळच्या अनेक दैनंदिन घटना पाहता येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रेषक या मालिकेबरोबर लगेच जोडला जात आहे असे दिसून येत आहे.      

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. अजूनही बरसात आहे या मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत. अश्या या रंजक मालिकेतील प्रमुख कलाकार, उमेश कामत बरोबर या मालिकेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी केलेली बातचीत.

By Harshada Vedpathak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »